Shruti Vilas Kadam
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, चेहरा धुतल्यानंतर २ ते ३ मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावणे अधिक फायदेशीर ठरते. यालाच ‘3-Minute Rule’ असे म्हटले जाते.
आंघोळीनंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर चेहरा टॉवेलने घासण्याऐवजी हलक्या हाताने टिपून कोरडा करा. त्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
मॉइश्चरायझर लावताना त्वचा थोडी दमट असणे महत्त्वाचे असते. चेहऱ्यावर हलका ओलावा राहिल्यास क्रीम अधिक चांगल्या प्रकारे काम करते.
थोड्या ओलसर त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यास ते त्वचेमधील ओलावा लॉक करून त्वचा अधिक हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावण्याची गरज नसते. चेहरा आणि मानेसाठी आवश्यक तेवढेच क्रीम वापरल्यास त्वचा चिकट वाटत नाही.
कोरडी, तेलकट किंवा संवेदनशील त्वचा यानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडणे महत्त्वाचे आहे. चुकीचे उत्पादन वापरल्यास त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
सकाळी आणि रात्री नियमित मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ, निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत मिळते.