Saroj Ahire: आमदार सरोज अहिरे यांच्या मातृत्वाची दखल, नागपूर विधीमंडळात 'हिरकणी' कक्ष सुरु

साम टिव्ही ब्युरो

नागपूर येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला.

Saroj Ahire | Saam TV

हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली.

Saroj Ahire | Saam TV

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरोज अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

Saroj Ahire | Saam TV

नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत.

Saroj Ahire | Saam TV

विधीमंडळ इमारतीतील दालन क्रमांक 106 मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

Saroj Ahire | Saam TV

याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Saroj Ahire | Saam TV

अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते.

Saroj Ahire | Saam TV
येथे क्लिक करा