Shruti Vilas Kadam
दूध, साखर (किंवा गूळ), दही (जामन/स्टार्टर) हे मुख्य साहित्य लागते.
दूध मध्यम आचेवर उकळत ठेवा आणि थोडे आटवून घ्या, त्यामुळे दही अधिक क्रीमी होते.
पॅनमध्ये साखर गरम करून हलका तपकिरी रंग येईपर्यंत वितळवा, यामुळे खास चव येते.
कॅरामेल केलेली साखर दूधात मिसळून चांगले ढवळा.
हे मिश्रण कोमट होईपर्यंत थंड करा, खूप गरम असल्यास दही बसणार नाही.
कोमट मिश्रणात थोडे दही घालून नीट मिक्स करा आणि झाकून ६-८ तास ठेवा.
दही सेट झाल्यावर फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा, चव अधिक छान लागते.