Shruti Vilas Kadam
साध्या कुर्त्यावर नाजूक मिरर वर्क आणि सोबत रंगीबेरंगी बांधणी दुपट्टा असा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसोबत हा लूक आणखी खुलतो.
लाल, गुलाबी, पिवळा किंवा हिरवा अशा ब्राइट रंगातील बांधणी प्रिंटचा स्ट्रेट कुर्ता सेट सणांसाठी उत्तम पर्याय आहे. त्यावर हलके मिरर वर्क असल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.
अनारकली कुर्त्यावर मिरर वर्क आणि बांधणी प्रिंटचा दुपट्टा असा लूक पारंपरिक आणि रॉयल वाटतो. लग्न, गरबा किंवा सणाच्या कार्यक्रमासाठी हा सेट निवडता येईल.
थोडा मॉडर्न लूक हवा असेल तर बांधणी प्रिंटचा शॉर्ट कुर्ता आणि प्लाझो अशी जोडी ट्राय करा. कुर्त्यावर मिरर वर्क असल्यास आउटफिटला फेस्टिव्ह टच मिळतो.
साध्या बांधणी कुर्ता सेटवर मिरर वर्क असलेले जॅकेट घातल्यास स्टायलिश लूक मिळतो. फेस्टिव्हल किंवा डे पार्टीसाठी हा फ्युजन लूक खास दिसतो.
बांधणी प्रिंटचा कुर्ता आणि त्यासोबत मिरर वर्क असलेली पॅंट असा सेट हटके दिसतो. मिनिमल दागिने आणि मोजडीसोबत हा लूक पूर्ण करता येईल.
विशेष कार्यक्रमासाठी कुर्त्यावर हेवी मिरर वर्क असलेला सेट निवडा. त्यासोबत कॉन्ट्रास्ट बांधणी दुपट्टा घेतल्यास संपूर्ण आउटफिटला आकर्षक आणि पारंपरिक लूक मिळतो.