Satish Daud
मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन ह्यांनी नुकत्याच एका अभियंत्याच्या कानाखाली लगावली.
सरकारी कामात कसूर केल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांनी अधिकाऱ्याला कानशिलात लगावली.
गीता जैन यांनी अभियंत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.
आमदार गीता जैन यांच्या या स्टंटनंतर युवक काँग्रेसने अनेक सवाल उपस्थित केले.
युवक काँग्रेसने शहरातील वेगवेगळ्या समस्यांबद्दल हातात पोस्टर धरून अनेक सवाल उपस्थित केले.
मॅडम आमदार, आत्ता कुणाच्या मारणार कानाखाली!' असे कॅम्पेन करत आमदारांना काही सवाल विचारले.
मीरा भाईंदरच्या या पोस्टर्स बॉईजची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
युवक काँग्रेसला आत्ता यावर आमदार गीता जैन यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे.