Shruti Vilas Kadam
सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईत १ लिटर पूर्ण फॅट दूध घ्या. मध्यम आचेवर दूध उकळायला ठेवा आणि अधूनमधून ढवळत राहा.
दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. दूध सतत ढवळत राहा. दूध घट्ट होऊन त्याचे प्रमाण कमी होईपर्यंत शिजवा.
दूध घट्ट झाल्यानंतर त्यात १ ते २ चमचे लिंबाचा रस थोडा थोडा घाला. यामुळे दुधाला दाणेदार पोत येण्यास मदत होते.
आता तयार मिश्रणात अर्धा कप साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा.
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात २ चमचे तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.
आता एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून घ्या. त्यामध्ये तयार मिश्रण ओता आणि चमच्याने व्यवस्थित पसरवा. थंड होण्यासाठी काही तास बाजूला ठेवा.
मिश्रण पूर्णपणे सेट झाल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करा. वरून बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवा. तयार आहे तुमचा स्वादिष्ट आणि दाणेदार मिल्क केक!