Shruti Vilas Kadam
साध्या डोकेदुखीत संपूर्ण डोक्यात सौम्य किंवा मध्यम वेदना होतात. मायग्रेनमध्ये मात्र डोक्याच्या एका बाजूला ठणकणाऱ्या आणि तीव्र वेदना जाणवतात.
साधी डोकेदुखी काही तासांत कमी होऊ शकते. मायग्रेनचा त्रास मात्र ४ ते ७२ तासांपर्यंत टिकू शकतो.
मायग्रेनमध्ये अनेकांना मळमळ, उलटी किंवा पोट बिघडल्यासारखं वाटू शकतं. साध्या डोकेदुखीत अशी लक्षणे सहसा दिसत नाहीत.
मायग्रेन असताना खूप लाईट, मोठा आवाज किंवा तीव्र वास सहन होत नाही. साध्या डोकेदुखीत ही समस्या कमी प्रमाणात असते.
तणाव, झोपेचा अभाव, भूक, हार्मोनल बदल, काही खाद्यपदार्थ किंवा हवामानातील बदल यामुळे मायग्रेनचा झटका येऊ शकतो. साधी डोकेदुखी बहुतेक वेळा थकवा, तणाव किंवा डिहायड्रेशनमुळे होते.
साधी डोकेदुखी असतानाही अनेकजण नियमित काम करू शकतात. मात्र मायग्रेनचा झटका आल्यास दैनंदिन कामे करणे कठीण होऊ शकते आणि विश्रांतीची गरज भासते.
साधी डोकेदुखी पाणी पिणे, विश्रांती घेणे किंवा सामान्य वेदनाशामक औषधांनी कमी होऊ शकते. मायग्रेनसाठी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशेष औषधे, जीवनशैलीतील बदल आणि ट्रिगर्स टाळणे आवश्यक असते.
(टीप : वारंवार डोकेदुखी, धूसर दिसणे, बोलण्यात अडचण, हात-पाय बधीर होणे किंवा इतर गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.)