Shraddha Thik
महिलांना मासिक पाळीत वेदना, पोटात दुखणे आणि अशा इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
मासिक पाळीचे दिवस हे खूप वेदनादायक असू शकतात. त्याच वेळी, काही महिलांना या दिवसांमध्ये फारशी समस्या येत नाही.
मासिक पाळीच्या आधीही, हार्मोनल चढउतारांमुळे, शरीर दुखणे, सूज येणे, चिडचिड होणे आणि मूड बदलणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याला PMS म्हणतात.
तज्ज्ञांनी सुचवलेली 2 योगासने मासिक पाळीच्या दिवसात पीएमएसची अस्वस्थता आणि लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
बालासनामुळे हिप्स मांड्या आणि पायाच्या टाचा, बोटांमध्ये ताण निर्माण होतो. तसेच कंबर, मान आणि खांदे मजबूत होण्यासदेखील मदत होते.
बालासन हे आसन खरे म्हणजे योग करतानाची विश्रांतीची मुद्रा समजली जाते. या आसनात शरीर गर्भाच्या स्थितीत जाते.
दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे पोटाला वर उचलून वाकवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. नंतर हळुवारपणे पोटाला खाली आणावे.