ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रदूषणामुळे साचलेला थर आपल्या खऱ्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो.
धूळ, माती आणि प्रदूषणाचे सेंद्रिय कण त्वचेला चिकटू शकतात. त्वचेच्या नैसर्गिक तेलासह (सेबम) ते त्वचेवर थरासारखे जमा होतात.
त्वचेला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी फक्त सकाळीच नाही तर रात्रीही त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्वचेला मॉइश्चरायझ करणारे क्लीन्सर/स्क्रब असलेले फेस वॉश वापरा.
त्वचेचे अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करणयासाठी नाईट सीरम वापरावे आणि बारीक रेषा, सुरकुत्या, हायपरपिग्मेंटेशन रोखण्यातही मदत होते. किमान ४५ एसपीएफ असलेले नाईट सीरम विकत घ्या आणि झोपण्यापूर्वी ते त्वचेवर लावा.
प्रदूषणामुळे त्वचेवर होणारे वाईट परिणाम दूर करण्यात मदत करणारे मॉइश्चरायझर नेहमी निवडा. चेहरा सतत धुण्याने त्वचेचे नैसर्गिक तेल हळूहळू संपते, दिवसभर त्वचेला मॉइश्चरायझर ठेवणारे मॉइश्चरायझर नियमितपणे वापरणे चांगले.
सनस्क्रीनला नियमित त्वचेची काळजी घेण्याचा एक भाग बनवा. एसपीएफ ३० किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन नेहमी खरेदी करा. हे प्रदूषण तसेच सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते.
धुळीच्या वातावरणात बाहेर राहिल्यानंतर त्वचेला काळजी आणि पोषण दोन्हीची गरज असते. त्वचेला ताजेतवाने करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मॉइश्चरायझिंग फेस मास्क लावणे.