ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या दैनंदिन जीवनात मेडिटेशन केल्याने आपले मन शांत होत असते.
तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी मेडिटेशन फार महत्त्वाचे आहे.
धावपळीच्या जीवनातून स्वत:च्या मनाला शांत करण्यासाठी मेडिटेशन एक उत्तम उपाय आहे. पण मेडियेशन करण्यासाठी योग्य मार्ग कोणता आणि योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.
दररोज मेडिटेशन केल्यामुळे आपली विचार शक्ती वाढते, मानसिक स्थिती सुधारते, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या विचांरावर नियंत्रण ठेवू शकता.
मेडिटेशन करण्याची योग्य वेळ सकाळी आहे. सकाळी शांत वातावरण असल्यामुळे तुम्ही शांतपणे मेडिटेशन करु शकता.
दररोज सकाळी लवकर उठून स्वत:साठी २० ते ३० मिनिटे मेडिटेशन करावे. तुम्ही दिवसांतून तीन वेळा १०-१० मिनिटांचे मेडिटेशन करु शकता.
दररोज मेडिटेशन केल्याने रक्तदाब कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते, मानसिक तणाव कमी होतो, याबरोबर अनेक आरोग्याचे फायदे होत असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: केसात गुलाबाचे फुल अन् दिसायला ब्यूटीफुल