Shruti Vilas Kadam
सकाळी मेडिटेशन केल्याने मेंदू शांत राहतो. सतत येणारे नकारात्मक विचार कमी होतात आणि तणाव, चिंता हळूहळू कमी होण्यास मदत होते.
दररोज १० मिनिटे ध्यान केल्याने मेंदू अधिक सक्रिय होतो. कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते आणि स्मरणशक्ती सुधारते.
मेडिटेशनमुळे शरीर रिलॅक्स होते, त्यामुळे हृदयाची धडधड सुरळीत राहते आणि उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
नियमित मेडिटेशन केल्याने झोपेचे चक्र संतुलित होते. रात्री लवकर झोप येते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
ध्यान केल्याने शरीरातील तणाव कमी होतो, ज्यामुळे इम्युन सिस्टम अधिक मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.
मेडिटेशनमुळे राग, चिडचिड कमी होते. मन अधिक शांत राहते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो.
सकाळी ध्यान केल्याने दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते. शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर काम करण्याची ताकद मिळते.