Shruti Vilas Kadam
मावा (खवा) हा दूध आटवून बनवलेला पदार्थ आहे जो केकला खास दाटपणा देतो. मावा केक ही पारसी बेकरीतील खासियत आहे.
१ कप मैदा, १/२ कप साखर, १/२ कप मावा (खवा), १/२ कप बटर, १ टीस्पून बेकिंग पावडर, २ अंडी, १/२ टीस्पून वेलदोडा पूड, थोडे काजू-बदाम सजावटीसाठी
मावा हलका तपकिरी होईपर्यंत पॅनमध्ये परतून घ्या. त्यामुळे त्याचा स्वाद अधिक चांगला येतो आणि केकला खास टेक्सचर मिळतो.
बटर आणि साखर एकत्र फेटा, त्यात अंडी घाला, मग भाजलेला मावा आणि वेलदोडा पूड मिसळा. नंतर मैदा आणि बेकिंग पावडर गाळून टाकून सर्व मिक्स करा.
तयार मिश्रण केक टिनमध्ये ओता. १८०°C वर प्रीहिट केलेल्या अवनमध्ये ३०–३५ मिनिटं बेक करा. वरून सोनेरी रंग आला की केक तयार.
बेक झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्या आणि वरून काजू-बदाम किंवा ड्राय फ्रूट्सने सजवा. वेलदोडा आणि माव्याचा सुगंध अप्रतिम लागतो.
मावा केक हा चहा किंवा कॉफीबरोबर खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. सण, मेजवानी किंवा गिफ्टसाठीही उत्तम पर्याय आहे.