Akshay Baisane | अक्षय बैसाणे
५० राज्ये ५० डेट्स! प्रेमाच्या शोधात निघाला तरुण.
अमेरिकेच्या मोंटाना राज्यात राहणारा हा तरुण.
त्याने परफेक्ट पार्टनरच्या शोधात नोकरीही सोडली.
२५ वर्षांच्या या तरुणाचं नाव मॅथ्यू वर्निग आहे. आतापर्यंत १०० मुलींना त्याने डेट केलंय.
५० राज्यातल्या ५० तरुणींना त्यानं डेट केलंय. आता त्याने पुन्हा ५० राज्यांचा दौरा आखला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने मुलींसोबत बोलणं सुरु केलं होतं.
जानेवारी २०२१ मध्ये त्याने मिशन डेटींग सुरू केलं. जून २०२१ मध्ये मॅथ्यूचं मिशन डेटींग पूर्ण झालं.
१०० मुलींना डेट करुनही तो महिलांना समजू शकला नाही असं मॅथ्यूने म्हटलंय.
टिकटॉकवर मॅथ्यूचे ५.५ लाख फॉलोअर्स आहेत.
50 Dates 50 States या मोहीमेच्या दुसऱ्या टप्पासाठी तो निघाला आहे.
त्याच्या या आगळ्या-वेगळ्या मोहीमेमुळे तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
त्याने या सर्व डेटींग्सचं चित्रीकरण करुन त्याची फिल्मही बनवली आहे.