Manasvi Choudhary
मटकीची भाजी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडते. मटकीची भाजी विविध प्रकारे बनवली जाते.
पण कधी तुम्ही मटकीचा ठेचा खाल्ला आहे का? अस्सल गावरान पद्धतीचा मटकीचा ठेचा अत्यंच चविष्ट लागतो. तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला हा ठेचा बनवू शकता.
ठेचा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवा.मटकीचा ठेचा बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, हिरवी मिरची, लसूण, जिरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मटकी चांगली परतून घ्या. नंतर मटकी एका प्लेटमध्ये काढून घ्या.
त्यानंतर पुन्हा कढईमध्ये गरम तेलामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घालून चांगले परतून घ्या
परतलेले सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा. त्यानंतर त्यामध्ये मटकी, शेंगदाणा कूट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. मिश्रण बारीक करा. अशाप्रकारे घरच्या घरी झणझणीत मटकीचा ठेचा तयार होईल.