Maharashtra Tourism: माथेरान, लोणावळाही पडेल फिकं; भंडारदऱ्यातील 'या' ७ जागांवर फिरून याच

Surabhi Jayashree Jagdish

विल्सन धरण

महाराष्ट्रातील भंडारदरा याठिकाणी फिरण्यासाठी विल्सन धरण हे एक खास आकर्षण आहे. हे धरण परवर नदीवर बांधलेले असून याला एक उत्तम पिकनिक डेस्टिनेशन मानले जाते.

अंब्रेला धबधबा

भंडारदरा पाहण्यासाठी अंब्रेला धबधबा खूपच मनमोहक आहे. उंचावरून कोसळताना या धबधब्याचे दृश्य अत्यंत मोहक दिसते.

रंधा धबधबा

भंडारदरामध्ये रंधा धबधबाही आहे, ज्याचं निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना खूपच आकर्षित करते. हा धबधबा लोकांना विशेष आवडतो.

आर्थर तलाव

महाराष्ट्रातील आर्थर तलाव हा खूपच सुंदर आहे. इथे आजूबाजूची हिरवळ आणि निसर्गाचे रमणीय दृश्य पर्यटकांना अत्यंत आवडते.

माउंट कळसुबाई

भंडारदरामधून माउंट कालसुबाईचे अद्भुत नजारे दिसतात. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून इथून दिसणारं दृश्य अप्रतिम असतं.

अगस्त्य ऋषी आश्रम

भंडारदरामध्ये असलेलं अगस्त्य ऋषी आश्रम हा देखील खास प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख रामायणामध्येही आढळतो.

रतनवाडी गाव

भंडारदराच्या परिसरात असलेलं रतनवाडी गाव हे ट्रेकिंग प्रेमींसाठी अगदी परफेक्ट आहे. साहसी अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.

Mughal Harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस काय-काय गोष्टी केल्या जायच्या?

येथे क्लिक करा