Siddhi Hande
थालीपीठ हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. मेथीचे थालीपीठ, डाळींचे थालीपीठ बनवतात.
आज आम्ही तुम्हाला पौष्टिक मटारचे थालीपीठ कसे बनवाये हे सांगणा आहोत.
मटार थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी मटार पाण्यात उकळून घ्या.
त्यानंतर हे मटार, हिरवी मिरची, आलं-लसूण,जिरं मिक्सरला बारीक करुन घ्या.
एका बाजूला कांदा आणि कोथिंबीर कापा.
यानंतर तुम्हाला एका भांड्यात मिक्स पीठ घ्यायची आहेत. डाळीचे, बाजरीचे, थोडसं गव्हाचं पीठ घ्या.
त्यानंतर त्यात हे वाटाण्याचे मिश्रण, कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट टाका.
यानंतर पीठ छान मळून घ्या. त्यानंतर एका कापडाला पाणी लावून त्यावर थालीपीठ थापून घ्या.
यानंतर तव्यावर छान तेल टाकून त्यावर थालीपीठ खरपूस भाजून घ्या.
हे थालीपीठ तुम्ही दही, लोणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात. हे थालीपीठ खूपच चविष्ट लागते.