Masala Sandwich: नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतोय? झटपट तयार करा चटपटीत मसाला सँडविच

Shruti Vilas Kadam

बटाट्याचे मिश्रण तयार करा

उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडे मीठ घाला.

Sandwich | pinterest

मसाले मिसळा

बटाट्याच्या मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि थोडी हळद घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून मसालेदार मिश्रण तयार करा.

Bombay Masala Sandwich | yandex

ब्रेडवर बटर लावा

ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर बटर लावा. त्यावर हिरवी चटणी लावल्यास सँडविचला अधिक चटपटीत चव मिळते.

Bombay Masala Sandwich Recipe | yandex

मसाला व्यवस्थित पसरवा

ब्रेडच्या एका स्लाइसवर तयार केलेले बटाट्याचे मसालेदार मिश्रण समान पसरवा. त्यावर कांदा, टोमॅटो किंवा काकडीचे स्लाइस ठेवू शकता.

Corn Sandwich | GOOGLE

चीज घालून सँडविच तयार करा

चीज आवडत असल्यास मिश्रणावर किसलेले चीज किंवा चीज स्लाइस ठेवा. त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच तयार करा.

Paneer Sandwich | yandex

सँडविच टोस्ट करा

सँडविच टोस्टर, ग्रिलर किंवा तव्यावर थोडे बटर लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत भाजा.

Masala Sandwich

गरमागरम सर्व्ह करा

तयार मसाला सँडविच दोन भागांत कापून टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा शेझवान चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Masala Sandwich

Thursday Horoscope: करिअरमध्ये प्रगती अन् अचानक धनलाभ; या ६ राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Thursday Horoscope | Saam Tv
येथे क्लिक करा