Gangappa Pujari
बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानंतर मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली.
बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.
रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.
रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सध्या रुचिरा काश्मिरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
रुचिराच्या काश्मिर सफरीमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...