Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे सध्या आघाडीची अभिनेत्री आहे.
प्रिया मराठे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच प्रियाने इंडोवेस्टर्न साडीमध्ये एका मराठमोळ्या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती.
प्रियाने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२३ ला खास साडीत हजेरी लावली होती.
तिच्या या साडीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
या पुरस्कार सोहळ्याची यंदाची थिम 'मराठी परंपरा विथ ट्विस्ट' अशी होती.
दिलेल्या थीमनुसार प्रियाने राखाडी रंगाची साडी नेसली होती.
प्रिया सध्या 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहावरील मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
प्रियाने यात खलनायिकेची भूमिका साकारली आहे.