Chetan Bodke
अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करते.
'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून सईने तिच्या सिने कारकिर्दिला सुरूवात केली.
अनेक मराठी आणि बॉलिवूडमध्ये हिट कामगिरी केल्यानंतर सईला 'फिल्मफेअर', 'आयफा' अशा अनेक मानाच्या पुरस्कारांवर तिने आपले नाव कोरले.
मध्यंतरी सईने 'BE रोजगार' आणि 'इंडिया लॉकडाऊन' या दोन वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या सईची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते, सई एका चित्रपटासाठी किती मानधन तुम्हाला माहित आहे का?
सई सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख इतकं मानधन घेते
तर सई बॉलिवूडमध्ये एका चित्रपटात काम करण्यासाठी २५ लाखांहून अधिकचं मानधन घेते.
मालिकेपासून आपल्या सिनेकारकिर्दिची सुरूवात करणाऱ्या सईने आज आपल्या यशाचा शिखर गाठलाय.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणरी अनेकदा तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.