Chetan Bodke
गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने आपली प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत मेहेंदीचे फोटो शेअर केले. गौतमीने आणि स्वानंदने २६ डिसेंबरला लग्नगाठ बांधली.
नुकतंच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने बहिणीच्या मेहंदीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
मृण्मयीने तिचे आणि तिच्या नवऱ्याचे ‘मेहंदी पासून सुरू करूया’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.
मृण्मयीने बहिणीच्या लग्नात चोळी आणि चोळीचीच फॅशनेबल साडी परिधान केली आहे.
मृण्मयीच्या नवऱ्यानेही अगदी तिलाच मॅचिंग कोट आणि कुर्ता वेअर केला आहे.
मृण्मयी कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत हटक्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
कोणतीही फॅशन असो, मृण्मयी खूप छान अंदाजात वेअर करत फोटोशूट करते.
अभिनेत्रीच्या फॅशनची नेहमीच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. तिच्या फॅशनला नेटकरी चांगला प्रतिसाद देतात.