Chetan Bodke
धनश्री काडगावकर मराठी टिव्ही सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी धनश्री काडगांवकर सध्या इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड रेड स्टायलिश घागरा वेअर करून स्टायलिश फॅशन केली आहे.
अभिनेत्रीने हा लूक एका खास इव्हेंटसाठी केला होता. सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत असून लूकचे कौतुक होत आहे.
स्टायलिश घागऱ्यावर धनश्रीने डायमंड नेकलेस आणि इयर रिंग्ज वेअर केला होता. सध्या तिच्या लूकचे कौतुक होत आहे.
सध्या तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये धनश्री काडगावकरने नंदिता वाहिनींचे पात्र साकारले आहे.
धनश्री गेल्या काही दिवसांपूर्वी ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
या मालिकेनंतर धनश्री कोणत्याही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही.