Chetan Bodke
सारेगमप लिटील चॅम्प्सच्या पहिल्या सीझनमधील अनेक स्पर्धक आजही चाहत्यांमध्ये चर्चिले नाव आहे.
त्यातीलच एक नाव म्हणजे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन होय.
नुकतंच प्रथमेश आणि मुग्धाने आपल्या गोड प्रेमाची कबुली दिली आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली देत फोटो शेअर केला आहे.
मुग्धा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुग्धा अनेकदा आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
मुग्धा नेहमीच वेगवेगळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
मुग्धा मुळची पुणेरी.
मुग्धा पार्श्वगायिका असून ती शास्त्रीय संगीत गाते.