Shraddha Thik
अभिनेत्री मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे हीच नुकतंच बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत लग्न झालं.
बहिणीच्या सासरी जाण्याने मृण्मयी तिच्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
ताईच शेपूट असणारी गौतमीसाठी मृण्मयी म्हणते, आमचं बाळ संसार करताना बघणं मजेचं असणार आहे.
'ताई तुला माझ्यासाठी वेळ नाही' असा एक दोघींचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल होत होता. त्यात दोघा बहिणींच्या नात्यातले गोड संबंध दिसतात.
स्वानंदला मृण्मयी म्हणते, तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाही, तु लग्नाआधीच फॅमिली मेंबर झालास.
नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते... अशा काही टीप्सही मृण्मयी देते.
'मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हणीन' अशी मृण्मयी म्हणते.