Gangappa Pujari
अभिनेत्री अदिती द्रविड सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय आहे.
ती 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेमधून घराघरात पोहोचली.
मालिकेतील तिने साकारलेल्या नंदिनीच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
याआधी तिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही काम केले होते.
सध्या अदितीने लिहलेल्या बाईपण भारी देवा चित्रपटातील मंगळागौर गाण्याचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
या गाण्याला युट्यूबवर 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अदिती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतेच तिने लाल कॉटन साडीतील सुंदर फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
तिच्या गाण्याप्रमाणेच अदितीच्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.