ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आभाळमाया या मालिकेतून स्वरांगी झळकली होती.
या मालिकेमध्ये ‘चिंगी’ची भूमिका साकारणारी स्वरांगी मराठे ही बालकलाकार तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती.
अवघा रंग एकचि झाला अशा नाटकांमधूनही ती बालभूमिकेत झळकली.
पुढे पोर बाजार, गोंदण, बॉलिवूड चित्रपट बाजीराव मस्तानी, स्वराज्यरक्षक संभाजी अशा चित्रपट आणि मालिकेतून स्वरांगीला अभिनयाची संधी मिळाली.
बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेली स्वरांगी उत्कृष्ट गायिका देखील आहे.
2016 साली स्वरांगी मराठे निखिल काळे सोबत विवाहबद्ध झाली.
लहानपणी स्वरांगीने गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.