Gangappa Pujari
मराठी मालिका जगतातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार
अभिनेत्री शिवानी सोनार आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
शिवानीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली
काही दिवसांपूर्वीच शिवानीने अभिनेता अंबर गणपुलेसोबत साखरपुडा उरकला.
आज वाढदिवसानिमित्त त्याने केलेली खास पोस्ट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे..
अंबरने सुंदर कॅप्शन देत होणाऱ्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
मी तुझा ऋणी आहे. जेव्हा तू माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी असतेस तेव्हा माझं आयुष्य खूप सुंदर असतं, असा खास कॅप्शन देत त्याने शिवानीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयुष्य रंगीबेरंगी आहे हे दाखवल्याबद्दल तुझा आभारी आहे. तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस जेव्हा माझा पडता काळ सुरू होता, तेव्हा तू मला वाचवलंस, असेही त्याने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.