Chetan Bodke
सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा सोशल मीडियावर चांगलाच गाजावाजा होत आहे.
अशातच या चित्रपटातील अनेक पात्रांची देखील चर्चा सध्या होत आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातून दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदे पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.
सनाने या चित्रपटात ‘महाराष्ट्र शाहीर’ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
सनाची ओळख म्हणजे, दिग्दर्शक केदार शिंदेंची लेक आणि शाहीर साबळे यांची ती पणती
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटानंतर कदाचित सनाची ओळख सना शिंदे म्हणून नाही, तर भानूमती साबळे अशी होईल.
आपल्या वडिलांचा सनाने वसा लहानपणा पासूनच घेतला होता.
तब्बल चार वर्ष सनाने वडील केदार शिंदे यांना असिस्ट केले होते.
चित्रपटाचे वडिल जरी दिग्दर्शक असले तरी, तिने चित्रपटासाठी स्क्रिने टेस्ट आणि लूक टेस्ट झाल्यानंतरच तिची निवड झाली.