ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
फॅशन आयकॉन सईला टॅटूचं ही फारच वेड आहे.
आज आपण तिच्या टॅटूंविषयी जाणून घेणार आहोत. नेमके हे टॅटू किती आणि कुणासाठी आहेत याचा खुलासा सईनं एका मुलाखतीत केला होता..
सईच्या अंगावर एकूण तीन टॅटू आहेत, त्या सर्व टॅटूचा वेगवेगळे आहेत, अनेकदा तिच्या टॅटूची चर्चा सोशल मीडियावर होते.
पहिला टॅटू माझ्या हातावर आहे, तो आहे स्टार. मला स्टारचा आकार खूप आवडतो म्हणून मी तो गोंदवला. आणि हा टॅटू काढल्यावर मी स्टार झाले.
दुसरा टॅटू माझ्या डाव्या हाताच्या मनगटाच्या खालच्या बाजूला आहे. त्या टॅटूमध्ये दोन रेषा आहेत, ज्या माझ्या आणि गिरीजा ओकच्या आहेत.
तिसरा टॅटू खांद्यावर आहे, रोमन आकड्यात खांद्यावर काही आकडे आहेत, हे आकडे २७\७\१३ हे आहेत. हे अंक खास व्यक्तीसाठी काढले होते. माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या तारखा आहेत. पण आता तो व्यक्तीच माझ्या आयुष्यात नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सईने हा टॅटू तिचा पती अमेय गोसावी साठी गोंदवला होता. त्यांचे एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम होते. सई आणि अमेयचं लग्न झालं होतं पण ते काही वर्षातच विभक्त झाले.
सईच्या हटक्या अंदाजातील फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरू असते.