Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीत सध्या सई ताम्हणकरची क्रेझ फारच वाढत आहे.
सई नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतेच सईने काही विशिष्ट शैलीतले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सईने हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यावर पिवळ्या रंगाची काठ असलेली साडी परिधान केलेली आहे.
सईने त्यावर न्यूड मेकअप केला असून गळ्यात ठुशी घातली आहे.
सई नेहमीच चाहत्यांसोबत साडीप्रेम शेअर करत असते.
गेल्या वर्षी सई ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती.
सईचा सोशल मीडियावर चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.
सई कोणत्या आगामी कलाकृतीत दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.