Pooja Dange
बिनधास्त, डॅशिंग अन् सोज्वळ अशा सर्व भूमिका लिलया पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे.
ऋतुजा बागवे आजपर्यंत अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
ऋतुजा बागवे नेहमी सोशल मीडियावर नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत असते.
ऋतुजाने नुकतेच लाईट ग्रीन रंगाच्या Co-rd सेटमध्ये फोटोशुट केलं आहे.
ऋतुजाच्या या ड्रेसवर नारंगी रंगाची फुले आहेत. ऋतुजाने एका फोटोमध्ये तिचा ड्रेस मोरासारखा फुलवला आहे.
ऋतुजा 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
'अनन्या' या नाटकातील तिच्या भूमिकेचे खुप कौतुक झाले.
ऋतुजा लवकरच 'अंकुश' आणि 'लंडन मिसळ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.