Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री रूचिरा जाधव नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रूचिराने नुकतंच वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले.
अभिनेत्रीने नुकतंच ब्लॅक शिमरी फुल्ल वनपिस वेअर करत खूप सुंदर फोटोशूट तिने केला आहे.
अभिनेत्रीने हा लूक एका पुरस्कार सोहळ्यासाठी केला आहे.
यावेळी अभिनेत्रीने ब्लॅक वनपिस, इयररिंग्ज आणि लूकला साजेसा मेकअप करत आपला लूक केला होता.
रूचिराच्या ह्या नव्या फॅशनवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत असून तिच्या स्टाईलचे कौतुक होत आहे.
'बिग बॉस मराठी ४' मध्ये सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आली होती.
त्यापूर्वी रुचिराने 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
या मालिकेत रूचिराने माया ही भूमिका साकारली होती. या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली.