Gangappa Pujari
सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु
आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.
चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.
सध्या सर्वत्र गणपती उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांच्या घरी गणराय विराजमान झाले.
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मराठी अभिनेत्रींनी खास लूक करत लक्ष वेधले.
सध्या अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या घरच्या बाप्पाचे फोटो व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये रिंकूचा खास लूक पाहायला मिळत असून तिच्या साडीतील सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.
गुलाबी साडी आणि केसात गजरा घातलेल्या खास लूकने रिंकूचे सौंदर्य खुलले आहे.