Chetan Bodke
अभिनेत्री आणि बिझनेस वूमन प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसोबत परदेश दौऱ्यामध्ये व्यग्र आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सिंगापूरमधून इन्स्टा लाईव्ह करत ‘प्राजक्तराज’ चा एक नवीन प्रॉडक्ट लाँच केला.
‘मोकळ्या घसाची वज्रटीक’ प्राजक्ताने हा दागिना घालून सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केले.
नुकतंच तिने सोशल मीडियावर इलकर फॉर्मेटची साडी परिधान करत लूकला साजेसे दागिने परिधान करत फोटो शेअर केले.
तिचा हा म्हाळसा कलेक्शनमधील दागिना आहे.
प्राजक्ताने जानेवारी २०२३ मध्ये स्वतःच्या मालकीचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला होता.
या ब्रँडमध्ये सर्व मराठमोळे दागिने असून चाहत्यांकडून तिच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.