Priya More
मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.
प्राजक्ता माळी सध्या तिचा आगामी चित्रपट 'तीन अडकून सीताराम'मुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी प्राजक्ता माळी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते.
नुकताच प्राजक्ता माळीने पिंक कलरच्या साडीमधील फोटोशूट शेअर केले आहे.
प्राजक्ताने पिंक साडीवर घातलेला डिझायनर ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्राजक्ताच्या बॅकलेस ब्लाऊजला फुलांसारखी भरगच्च डिझाइन केले आहे.
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने पाठमोरी उभी राहून पोझ दिल्या आहेत.
प्राजक्ताने हे फोटो इन्स्टावर शेअर करत 'Pink And Curves' असे कॅप्शन दिले आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली असून आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
प्राजक्ताच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.