Chetan Bodke
मराठमोळी मृण्मयी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतली आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मृण्मयी देशपांडे कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री पूजा- सिद्धेशच्या लग्नाला उपस्थिती लावली होती, यावेळी अभिनेत्रीने मराठमोळा लूक केला होता.
आपल्या खास मैत्रिणीच्या लग्नासाठी मृण्मयीने स्पेशल पिवळी साडी नेसली होती.
फुल्ल स्लिव्हज गुलाबी ब्लाऊज आणि पिवळी साडी परिधान करून अभिनेत्रीने मराठमोळ्या अंदाजात उपस्थिती लावली होती.
नाकात नथ आणि कानामध्ये झुमका वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्रीच्या लूकची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.
मृण्मयीने लग्नातले फोटो शेअर करताना, “पूजाचे लग्न” असं कॅप्शन देत फोटो शेअर केले. अभिनेत्रीचे हे फोटो सिद्धार्थ चांदेकरने क्लिक केले.
मृण्मयीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.