ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिथिलाला आज कोण ओळखत नाही. तिचा अभिनय असो, फोटो असो, नृत्य असो किंवा गायन असो लोकं अक्षरशः तिच्यासाठी वेडे आहेत.
अभिनेत्री मिथीला पालकरविषयी माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या
मिथिलाचा जन्म मुंबईत झाला असून लहानाची मोठी मुंबईतच झाली
मिथिलाल संगीताची लहानपणापासूनच आवड आहे युट्यूब चॅनलवर ती व्हिडीओ पोस्ट करत असते.
मिथिला म्हणते 'इंटरनेट हे माझं घर आहे. इंटरनेटनं मला ओळख मिळवून दिली आहे आणि इंटरनेटच माझं सर्वकाही आहे.
प्लॅस्टिक कपचा वापर संगीतवाद्य म्हणून करून 'ही चाल तुरू तुरू या' मराठी गाण्याचा व्हिडीओ तिनं तयार केला.
तिच्या या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि बॉलिवूडच्याही काही लोकांनी तिच्या या व्हिडिओला प्रतिसाद दिला.
यानंतरच मिथिलाच्या खऱ्या करिअरला सुरूवात झाली आहे असं तिने सांगितले आहे.