Chetan Bodke
रानबाजार वेबसीरिजच्या माध्यमातून माधुरी पवार बरीच चर्चेत आली होती.
'अप्सरा आली'या डान्स शोची विजेती असलेल्या माधुरीचे सध्या काही खास फोटो बरेच व्हायरल होत आहेत.
यावेळी माधुरी तिच्या पारंपारिक कपड्यांमुळे सध्या बरीच चर्चेत आली आहे.
माधुरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत खास शैलीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
माधुरीने नुकताच तिच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
माधुरी लवकरच 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
माधुरीची या चित्रपटात कोणती भूमिका असणार अद्याप हे अस्पष्ट असून ती पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे.
लवकरच माधुरी रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.