Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी कायमच चाहत्यांमध्ये आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटातून मल्याळम सिनेसृष्टीमध्ये डेब्यू केलं आहे.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटातून सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या अप्सरेचे सोशल मीडियावर लाल कलरची साडी वेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसते.
नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर रेड कलरची कांजीवरम साडी परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप करत हटके फोटोशूट केले.
सोनालीने या मराठमोळ्या लूकला साजेसे दागिने परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
मराठमोळ्या अप्सरेच्या फोटो पोजेसची सध्या जोरदार चर्चा होते.
सोनालींच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.