Manasvi Choudhary
मराठी मालिकेतला हसरा चेहरा म्हणून अक्षया देवधरची ओळख आहे.
अक्षया 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पाठकबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात घराघरात पोहोचली.
अगदी कमी वेळात अक्षयाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी अक्षया सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे.
नुकतंच एका मुलाखतीत हार्दिकने अक्षया मालिका आणि चित्रपटात काम करत नसल्याचे कारण सांगितले आहे.
पती हार्दिक जोशीने तिने सध्या ब्रेक घेतला असून काही काळानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या हटके अंदाजात दिसेल असे त्याने सांगितले आहे.
आगामी काळात अक्षयाला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत.