Chetan Bodke
आज महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अवघ्या महाराष्ट्रात आज छत्रपती शिवरायांचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
मराठी मनोरंजन विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पराक्रमावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत.
चला तर एक नजर टाकूया कोणकोणत्या मराठमोळ्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
स्टार प्रवाह वरील 'राजा शिवछत्रपती' मालिकेत डॉ. अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटामध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी महाराजांची भूमिका साकारली आहे.
'स्वराजरक्षक संभाजी' मालिकेतून शंतनू मोघेंनी साकारलेले शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारली.
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनीने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी अनसंग वॉरियर' चित्रपटात शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.