Chetan Bodke
२०२३ प्रमाणेच २०२४ या वर्षातही अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार असंच दिसतंय.
‘टाईमपास’ फेम 'दगडू' अर्थात प्रथमेश परबच्या घरी त्याच्या लग्नाची लगीनघाई सुरू झाली आहे.
लवकरच तो गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या केळवणाला सुरूवात झाली आहे.
प्रथमेशने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर केळवणाचा फोटो शेअर केला आहे.
त्यांनी लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितली नसून, व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.
प्रथमेश परब गेल्या काही वर्षांपासून क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे.
क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते.
प्रथमेश आणि क्षीतिजाच्या रिलेशनची तुफान चर्चा रंगली होती. प्रथमेशला रिअल लाइफमध्ये प्राजू भेटल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.