Shreya Maskar
अंकुश चौधरी आजवर सुपरहिट दमदार भूमिकेत झळकला आहे.
अंकुश चौधरीला आजवर चाहते रोमँटिक, अॅक्शन हिरोच्या अंदाजात पाहत आले आहेत.
अंकुश चौधरीने वाढदिवसाला 'पी.एस.आय अर्जुन' चित्रपटाची घोषणा केली होती.
प्रेक्षकांना आता अंकुशच्या आगामी 'पी.एस.आय अर्जुन' चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
'पी.एस.आय अर्जुन' चित्रपटात अंकुश चौधरीने पी.एस.आय अर्जुन देशमानेची भूमिका साकारली आहे.
"थांब म्हटलं की थांबायचं..!" हा त्याचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक पाहायला मिळत आहे.
मराठी अभिनेता अंकुश चौधरीचा 'पी.एस.आय अर्जुन' चित्रपट 9 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.