Akshay Baisane | अक्षय बैसाणे
'नासा'मध्ये काम केलेल्या भारतीय वंशाच्या २४ वर्षीय मंजू बँगलोरची तिच्या बिकिनी फोटोंमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.
भौतिक शास्त्रज्ञ, लेखिक, अभिनेत्री, मॉडेल आणि समाज सेविका मंजू बंगलौर हिच्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर एकच खळबळ उडवली आहे.
अलिकडेच ती नासाच्या मंगळ प्रोजेक्टमध्ये सुद्धा सामिल झाली होती. परंतु सध्या ती आपल्या बिकिनी कॅटवॉकमुळे चर्चेत आहे.
मंजूने एयरोस्पेस इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. सध्या ती नासाच्या Scientist-Astronaut Candidate Program मध्ये काम करतेय.
तिने नासामध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये इंटर्नशीप केली असून सध्या ती सायंटिस्ट-ॲस्ट्रॉनॉट कँडिडेट प्रोग्राममध्ये आहे. याअंतर्गत ती अवकाशात देखील जाऊ शकते.
भारताचा अभिमान असणाऱ्या अंतराळवीर कल्पना चावला तिच्या आदर्श आहेत. वयाची ३० वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मंजूला अंतराळात जायचे आहे.
एक फिजिसिस्ट, लेखिका, अभिनेत्री, दोन NGO ची संस्थापक, मिस वर्ल्ड कॅलिफोर्निया २०१९ आणि आता SI स्विम रनवे मॉडेल अशी ओळख मंजूने बनवली आहे.
रिपोर्ट्सनुसार मंजूचे आई-वडील मुळचे कर्नाटकमधील आहेत. १९६० साली तिचे कुटुंबीय अमेरिकेत गेले होते, त्यावेळी त्यांनी एक सीड रिसर्च कंपनी सुरू केली होती.
मंजू इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव्ह असून तिचे चाहते तिला भरभरुन प्रेम देतात.