Priya More
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ममताने सन्यास घेतला आहे.
ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे.
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यादरम्यान किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली.
ममता कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असून ती अनामिक जीवन जगत होती.
ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यामुळे आता तिला तिची संपत्ती लोककल्याणासाठी वापरावी लागणार आहे.
ममता कुलकर्णीच्या एकूण संपत्ती बद्दल बोलायचे झाल्यास ती तब्बल ८५ कोटींची मालकीण आहे.
ममता कुलकर्णीने तिच्या करिअरच्या काळामध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ममता कुलकर्णी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि ती सर्वात जास्त मानधन घ्यायची.
सिनेसृष्टीपासून दूर गेल्यानंतर ममता कुलकर्णीने प्रॉपर्टीमध्ये मोठ गुंतवणूक करत संपत्ती वाढवली.
ममता कुलकर्णीने चित्रपटांसोबत जाहिरातींमधून देखील चांगला पैसा कमावला.