Malshej Ghat: फॅमिलीसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई पुण्याजवळील 'या' सुंदर हिल स्टेशनला नक्की जा

Shruti Vilas Kadam

निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले माळशेज घाट हे ठिकाण हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि धुक्याने दाटलेल्या वातावरणांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे.

Malshej Ghat | Saam Tv

पक्षी निरीक्षणासाठी आदर्श

पिंपळगाव-योगा धरणाच्या परिसरात विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. हे ठिकाण पक्षीप्रेमींसाठी एक स्वर्गच आहे.

Malshej Ghat | Saam Tv

ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचे केंद्र

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग करण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. हे ठिकाण साहसप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.

Malshej Ghat | Saam Tv

नवीन पर्यटन प्रकल्पांची योजना

महाराष्ट्र सरकारने माळशेज घाटात 115 मीटर लांबीचा काचांचा स्कायवॉक आणि पर्यटक संकुल उभारण्याची योजना मंजूर केली आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळेल

Malshej Ghat | Saam Tv

सहज पोहोचण्याचे ठिकाण

माळशेज घाट मुंबईपासून सुमारे 154 किमी आणि पुण्यापासून सुमारे 164 किमी अंतरावर आहे.

Malshej Ghat | Saam Tv

राहण्यासाठी विविध पर्याय

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे फ्लेमिंगो हिल्स रिसॉर्ट आणि इतर खाजगी रिसॉर्ट्स येथे उपलब्ध आहेत.

Malshej Ghat | Saam Tv

वर्षभर भेट देण्यास योग्य

माळशेज घाट हे हिल स्टेशन वर्षभर भेट देण्यास योग्य आहे.

Malshej Ghat | Saam Tv

Panvel Tourism: उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जावंस वाटतंय? पनवेलमधील या ठिकाणाला नक्की भेट द्या

Panvel Tourism | Saam Tv
येथे क्लिक करा