Shreya Maskar
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात, बंगळुरू-चेन्नई महामार्गाजवळ ऐतिहासिक मल्लापाडी किल्ला वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे.
मल्लापाडी किल्ल्यावर मध्ययुगीन लष्करी वास्तुकला पाहायला मिळते. मल्लापाडी किल्ला हा ऐतिहासिक 'बारामहल' तटबंदी प्रणालीचा एक भाग आहे.
मल्लापाडी किल्ला हा कृष्णगिरी जिल्ह्यातील एक कमी ज्ञात टेकडीवर वसलेला आहे. याची विशेषतः म्हणजे राज्यातील प्रागैतिहासिक काळातील खडकांवरील कलाकृतींचे (रॉक आर्ट) पहिले नोंदणीकृत स्थळ होय.
मल्लापाडी किल्ल्याला 'वनगिरीदुर्गम' असेही म्हणतात. किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात प्राचीन काळातील पांढऱ्या रंगातील चित्रे आढळतात.
स्थानिक माहितीनुसार, मल्लापाडी किल्ला १६ व्या ते १७ व्या शतकात बांधला गेला असावा, असे बोले जाते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
टेकडीच्या नैसर्गिक रचनेनुसार स्थानिक ग्रॅनाइट दगडांचा वापर करून बांधलेली ही रचना, 'बारामहल'च्या धोरणात्मक संरक्षण प्रणालीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.