Malai Kofta Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट बनवा हॉटेलस्टाईल क्रीमी आणि चविष्ट मलाई कोफ्ता, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

मलाई कोफ्त्यासाठी साहित्य घ्या

कोफ्त्यासाठी २०० ग्रॅम पनीर, २ उकडलेले बटाटे, २ चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ आणि थोडा गरम मसाला घ्या. ग्रेव्हीसाठी २ टोमॅटो, १ कांदा, काजू, आलं-लसूण पेस्ट, क्रीम, तेल आणि आवश्यक मसाले तयार ठेवा.

Malai Kofta Recipe | yandex

कोफ्त्याचं मिश्रण तयार करा

पनीर किसून घ्या आणि त्यात मॅश केलेले बटाटे, कॉर्नफ्लोअर, मीठ व गरम मसाला घाला. सर्व साहित्य एकत्र करून मऊसर मिश्रण तयार करा. मिश्रण खूप ओलसर असल्यास थोडं कॉर्नफ्लोअर वाढवा.

Malai Kofta Recipe | Google

कोफ्त्याचे गोळे तळून घ्या

मिश्रणाचे छोटे गोल गोळे तयार करा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कोफ्ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. कोफ्ते फुटू नयेत म्हणून तळण्यापूर्वी एका छोट्या गोळ्याची चाचणी करा.

Dhaba Style Malai Kofta | Social Media

ग्रेव्हीसाठी मसाला तयार करा

कढईत थोडं तेल किंवा बटर गरम करा. त्यात कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट आणि भिजवलेले काजू घालून शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Fry the kofta

क्रीमी ग्रेव्ही बनवा

कढईत बटर गरम करून त्यात वाटलेला मसाला घाला. हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून परता. आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही शिजवा. शेवटी क्रीम घालून मंद आचेवर एक उकळी आणा.

Make the kofta

कोफ्ते आणि ग्रेव्ही एकत्र करा

तयार ग्रेव्ही गॅसवरून उतरवल्यानंतर त्यात तळलेले कोफ्ते घाला. कोफ्ते ग्रेव्हीत जास्त वेळ ठेवल्यास ते मऊ पडू शकतात. त्यामुळे सर्व्ह करण्याच्या अगदी आधीच कोफ्ते घालणं उत्तम.

Malai Kofta Recipe

मलाई कोफ्ता सजवून सर्व्ह करा

तयार मलाई कोफ्त्यावर थोडं फ्रेश क्रीम, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घाला. गरमागरम मलाई कोफ्ता बटर नान, रोटी, पराठा किंवा जिरा राइससोबत सर्व्ह करा.

Dhaba Style Malai Kofta | Social Media

Custard Apple Buying Tips: गोड आणि रसाळ सिताफळ कसं ओळखाल? खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा

Custard Apple Buying Tips | Saam Tv
येथे क्लिक करा