Surabhi Jayashree Jagdish
ऑफिस किंवा शाळेच्या डब्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल तर आपण पराठे बनवतो.
मात्र जर तुम्हाला तुमचे पराठे अजून चवदार बनवायचे असतील तर आम्ही तुम्हाला आज एका खास मसाल्याबद्दल माहिती देणार आहोत.
हा मसाला तुम्ही पराठ्याचं पीठ मळताना किंवा पराठा लाटताना त्यावर भुरभुरुन वापरू शकता. यामुळे पराठ्याला एक वेगळीच चव येते.
२ मोठे चमचे धणे, १ मोठा चमचा जिरे, १ छोटा चमचा ओवा, १/२ छोटा चमचा काळी मिरी, १/४ छोटा चमचा बडीशेप, १/२ इंच दालचिनीचा तुकडा, २-३ लवंगा, १ छोटा चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा आमचूर पावडर, १/२ छोटा चमचा हळद पावडर, १/४ छोटा चमचा हिंग, १ छोटा चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, १/२ छोटा चमचा चाट मसाला
एका पॅनमध्ये किंवा कढईत धने, जिरे, ओवा, काळी मिरी, बडीशेप, दालचिनी आणि लवंगा मंद आचेवर हलके भाजून घ्या. भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर हे भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, हळद पावडर, हिंग (असल्यास), कसुरी मेथी, मीठ आणि चाट मसाला घाला.
तयार झालेला मसाला एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा मसाला तुम्ही साधारण १-२ महिने वापरू शकता. पराठ्याचं पीठ मळताना १-२ चमचे हा मसाला पिठात मिसळून मळू शकता.