Shruti Vilas Kadam
मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करून आपल्या स्किन टाइपनुसार क्लेंझिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे महत्त्वाचे आहे. स्किन प्रेप योग्य नसेल तर मेकअप फ्लॉलेस दिसत नाही.
त्वचेपेक्षा खूप हलका किंवा गडद फाउंडेशन लावल्याने चेहरा नैसर्गिक दिसत नाही. योग्य शेड तपासण्यासाठी फाउंडेशन हातावर नव्हे, तर जॉलाइनवर लावून पाहावे.
दाग-धब्बे झाकण्यासाठी फाउंडेशनची जाड लेअर लावणे टाळा. जास्त प्रोडक्ट वापरल्याने मेकअप केकी दिसू शकतो. कंसीलरचाही वापर संतुलित प्रमाणात करावा.
फाउंडेशन, ब्लश आणि ब्रॉन्झर नीट ब्लेंड न केल्यास चेहऱ्यावर वेगवेगळ्या लेअर्स आणि पॅची भाग दिसू शकतात. जॉलाइन, मान आणि कानाजवळही बेस व्यवस्थित ब्लेंड करा.
ऑयली त्वचेमुळे जास्त पावडर लावण्याची सवय असेल तर ती टाळा. अधिक पावडरमुळे मेकअप चॉकसारखा दिसू शकतो. आवश्यक भागावरच पावडर वापरणे योग्य.
आयब्रो डिफाइन करताना काळ्या रंगाऐवजी आपल्या भुवयांच्या रंगाशी जवळचा ब्राऊन शेड निवडा. इनर कॉर्नरपासून डिफाइनर लावल्यास भुवया अधिक जाड आणि अनैसर्गिक दिसू शकतात.
शिमर किंवा ग्लिटर वापरणार असाल तर आधी आय मेकअप करा आणि त्यानंतर फेस बेस तयार करा. आयशॅडोचे रंगही व्यवस्थित ब्लेंड करणे आवश्यक आहे.